Chhatrapati Sambhajinagar News : हद्यद्रावक! बसचे चाक डाेक्यावरुन गेले, 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे एका 5 वर्षाच्या बालकाच्या डोक्यावरून स्कूल बसचे चाक गेले. या घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला. हर्षद अनिल हातांगळे असे मृत बालकाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेनंतर बालकाचे कुटुंब शाेकसागरात बुडाले. 

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी - हर्षद याच्या डाेक्यावरुन तब्बल दोन वेळा चाक गेले. त्यातच तो चिरडला गेला. त्यामुळे निष्पाप हर्षदचा जीव गेला. यावेळी घटनास्थऴी माेठा जमाव जमला हाेता.

Pm Modi Visit : PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

हर्षद हातांगळे याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच त्यांच्या पायाखालची वाऴू सरकली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply