Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भरदिवसा एका व्यक्तीच्या घरात दोन अज्ञातांनी घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील पुंडलिक नगर परिसरामध्ये घडली आहे.

ज्या व्यक्तीच्या घरात गोळीबार झाला ती व्यक्ती मनपा स्वच्छता कर्मचारी आहे. या अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पीडित व्यक्तीने समय सूचकता दाखवत मान बाजूला केली, म्हणून त्यांचे थोडक्यात प्राण वाचले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गोळीबार केल्यानंतर या दोन्ही अज्ञात व्यक्तींनी पळ काढला आहे. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात आरोपी दिसत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *