Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! पिसाळलेल्या घोड्याचा वृद्ध दांपत्यासह ६ जणांवर हल्ला; परिसरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वडवाळी शिवारात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालून वृद्ध दाम्पत्यासह पाच ते सहा जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत आपण पिसाळलेल्या कुत्र्याने, माकडाने चावा घेतल्याचे ऐकलं होतं. परंतु छत्रपती संभाजीनगर  वडवाळी शिवारात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालून वृद्ध दाम्पत्यासह पाच ते सहा जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Kolhapur Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

नरहरी गायकवाड व सुमनबाई नरहरी गायकवाड असे गंभीर जखमी वृद्ध दाम्पत्याचे नाव असून इतरांची नावे कळू शकली नाही. वडवाळी शिवारातील पांडुरंगनगरमध्ये नरहरी गायकवाड कुटुंबासह राहतात. शुक्रवारी ते व त्यांची पत्नी सुमनबाई हे दोघे घरी असताना परिसरात धुमाकुळ घालत आलेल्या एका पिसाळलेल्या घोड्याने सदर वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले.

त्यानंतर हा घोडा दुसऱ्या भागात गेला. तेथेही त्याने पाच ते सहा जणांना चावा घेतला. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गायकवाड दाम्पत्याला ग्रामस्थांनी पैठण येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. येथ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply