Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न पेटला, जायकवाडी धरणावरून आंदोलन चिघळलं

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं आहे. जालना-संभाजीनगर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केलं आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंदारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रोड गेल्या २ तासांपासून रोखला आहे. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कल्याण काळे हे नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यासह आजी-माजी आमदार देखील या आंदोलनाला उपस्थित होते.

             

Nagpur RTO : कामाचा 'ओव्हरलोड ! नागपूरला मिळेना पूर्णवेळ ‘आरटीओ’, नागपूर व अमरावती विभागाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे

आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांना एका बाजूला रस्ता सोडण्यास सांगितले. मात्र, त्याला आंदोलकांनी विरोध केला, त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे अनेक आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, इतर नेते आमदार यांच्यावर देखील कारवाईची शक्यता आहे. हा मुख्य रस्ता आंदोलकांनी अडवला आहे. आताच पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करावी, नाहीतर आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

जवळपास २० ते २२ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच आहे.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रोड गेल्या २ तासांपासून रोखला आहे. रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको करण्यात आलं आहे. रास्तारोकोमुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply