Chhatrapati sambhajinagar :  उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

Chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्ड्या यांच्या घरी काही दिवसापूर्वी मोठा दरोडा पडला होता. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लड्डाच्या मित्रांनीच दरोडेखोरांना सगळी माहिती दिल्याचे तपासातून उघड झाले आहे. दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. बाळासाहेब चंद्रकांत इंगोले या मित्राने लड्डा यांच्याबाबत आणि बिझनेस, घरातील माहिती दरोडेखोरांना दिल्याचे उघड झाले आहे.

लड्डा यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांना संपत्तीची माहिती देणाऱ्या आरोपीसह दहा जणांना संभाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज अटक केलेल्या आरोपीचे नाव देवीदास नाना शिंदे असं आहे. देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. त्याला गुप्तधन, काळ्या जादूचा नाद असल्याचं तपासात समोर आलंय. तो हाजबेचा मित्र असून त्यांनी यापूर्वी अनेक वेळा गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली

देवीदासला त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या घरात कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या देवीदास नाना शिंदे याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे आता उघड झाले. हे पुराव्यानिशी निष्पन्न होताच गुन्हे शाखेने त्याला अटक केली. १५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सोमवारी रात्री दरोड्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या एमआयडीसी ठाण्यात अमोल बाबूराव खोतकर याचा गुन्हे शाखेने एन्काउंटर केला. तर त्याचे साथीदार योगेश सुभाष हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, महेंद्र माधव बिडवे, सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख यांची सध्या पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एनकाउंटर झालेल्या अमोलकडील सोने कोणाकडे आहे यासाठी पोलीस कसोशीने तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *