Bus Accident : मोठा अनर्थ टळला; वेरूळ घाटामध्ये बसचा भीषण अपघात, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

 

Chhatrapati Sambhajinagar : चाळीस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला वेरूळ घाटामध्ये भीषण अपघात झाला. मागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने बस दरीत कोसळली असती. सुदैवाने पुढे जाऊन बस कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराची संभाजीनगर- धुळे ही बस धुळे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बस वेरूळ घाटामध्ये असल्याने थोडी हळू चालत होती. मात्र मागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे (Bus Accident) बस बाजूला असलेल्या कठड्याला ही बस जाऊन अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली आहे.

Lonar Sarovar : लोणार सरोवर परिसरात जाताय तर आधारकार्ड आवश्यक; अप्रिय घटना रोखण्यासाठी निर्णय


प्रवाशांमध्ये घबराट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा (Accident) अपघात झाला. हि बस रस्त्यावरील कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे या अपघातात बसमधील ४० प्रवासी हे थोडक्यात बचावले असून सुखरूप असल्याची माहिती आहे. दरम्यान टेम्पोने धडक दिल्याने बसमधील सर्व प्रवाशी घाबरले होते. अपघातानंतर खाली उतरल्यानंतर खोल दारी पाहून घबराट निर्माण झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply