Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यास छगन भुजबळांसह राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार सभा घेतली. या सभेत केलेल्या भाषणात भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. भुजबळ हे मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकादेखील करू लागले आहेत.
ओबीसी एल्गार सभेतील छगन भुजबळांच्या भाषणावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती.
|
रोहित पवार यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी भुजबळ म्हणाले, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी शरद पवार स्क्रिप्ट देत नव्हते, अजित पवार ना ,फडणवीस, ना एकनाथ शिंदे, मला कोणीच स्क्रिप्ट देत नाही. गेल्या ३५ वर्षांपासून मी हे काम करत आहे. मी ओबीसींचं काम हाती घेतलं आहे आणि हेच माझं स्क्रिप्ट आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच माझं स्क्रिप्ट आहे. मंडल आयोगाचा अहवाल हे माझं स्क्रिप्ट आहे. बहुजन समाज, ओबीसी समाजाचं स्क्रिप्ट तेच माझं स्क्रिप्ट.
शहर
- Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, आर्थिक तणाव अन् वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या, पोलिसांचा रिपोर्टमधून दावा
- Pimpri-Chinchwad News : मुळा नदीत जेसीबीद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश
- Ratnagiri : वरवडे येथे एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारीस मदत करणाऱ्या नौकेवर कारवाई
महाराष्ट्र
- Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश
- Thane : ठाण्यातील कलेक्टरच्या पीए पल्लवी सरोदे यांचा मृत्यू
- Leopard Attack : जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी अंगणात गेली; चिमुकलीवर बिबट्याची झडप, रात्रीची थरारक घटना
- Dharashiv : मार्च अखेरीस केवळ ३४ टक्के पाणीसाठा; धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातील स्थिती
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं