Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट; छगन भुजबळांनी निवडणूक लढावी, समता परिषद आणि ओबीसी संघटनांचा बैठकीत ठराव

Chhagan Bhujbal : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महायुतीच्या जागावाटपात छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. या जागेवरून सोमवारी रात्रीपासून शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. अशात नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी बैठकीत केला आहे. या ठरावामुळे छगन भुजबळांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी लोकसभा लढावी, यावरून भुजबळ फॉर्मवर समता परिषदेची तातडीची बैठक आयोजित केली. समता परिषदेसह अन्य ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली. भुजबळांनी निवडणुकीतून माघार न घेण्याविषयी बैठक आयोजित केली.
 
या बैठकीत नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या बैठकीत एकमतानं पास करण्यात आला. समता परिषद आणि ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते भुजबळांना भेटून निवडणूक लढवण्याची करणार मागणी करणार आहेत. तसेच यावेळी जातनिहाय जनगणना, आरक्षण यांसह ओबीसींसाठी स्वतंत्र बजेट अशा ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, 'नाशिकची निवडणूक लढण्याचा महिलांचा आग्रह आहे. मी नाराज नाही. आता मी निर्णय घेतला आहे. आयुष्यात एकदाच तिकीट मागितलं. नंतर मी तिकीट वाटले, पुन्हा तिकीट मागितले नाही. राष्ट्रवादीचा नाशिकच्या जागेवर दावा अद्यापही कायम. आमच्याकडे खूप उमेदवार आहेत'.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply