Chhaava Tax Free : छावा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

 

Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free : विकी कौशलच्या छावा चित्रपटाने नवा विक्रम रचलाय... छावा चित्रपटाने नेमकी किती कमाई केलीय आणि कोणत्या चित्रपटाप्रमाणे छावाची घोडदौड सुरु आहे? मध्य प्रदेशमध्ये छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय, त्यानंतर महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात यावा, या मागणीने जोर धरलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छावा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली आहे. बाहुबलीच्या वेगत छावाची कमाई सुरू आहे, आता हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार का? याकडे लक्ष लागलेय.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गर्जना करतोय.. चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेत.. मात्र आता छावाने थेट बाहुबली 2 या चित्रपटाच्या कमाईशी स्पर्धा सुरु केलीय..मात्र आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड रचलाय? पाहूयात..

Kopargaon Crime : साई भक्तांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार; सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

'छावा'ची रेकॉर्डब्रेक झेप

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

जवान, अॅनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

गदर 2 आणि स्त्री 2 - 5 दिवसात 200 कोटी

बाहुबली 2 - 6 दिवसात 200 कोटी

बाहुबलीच्या वेगात विकीचा 'छावा'

बाहुबली 2 चित्रपटाने 1400 कोटींच्या कमाईचं उड्डाण घेतलं होतं... आता त्याच वेगाने छावा चित्रपट गर्जना करत झेप घेतोय.. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवणार का? याकडे लक्ष लागलंय...

अभिनेता विकी कौशलच्या छावाने पहिल्याच दिवशी 33 कोटींची कमाई केली होती... त्यानंतर वर्किंग डे चा छावाच्या कमाईवर कोणताच परिणाम दिसला नाही....सहाव्या दिवशीही छावाच्या कमाईची घोडदौड कायम आहे... मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट असल्याने छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत असतानाच.. राज्यात 2017 पासून करमणूक करच नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply