Chhatrapati Sambhaji Nagar : नाशिकच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदापात्रातात सोडल्याने गोदामाई खळाळली; संभाजीनगरच्या १७ गावांना इशारा

वैजापूर - गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरून ''ओव्हरफ्लो'' झाली. या धरणातील अतिरिक्त पाणी गोदापात्रातात सोडल्याने गोदामाई खळखळून वाहत असून सध्या निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदापात्रात १३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे. यामुळे वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी वाढवून पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यातील गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आले आहे.

Rohit Pawar News : अजितदादा, सुप्रिया ताईंनंतर आता रोहितदादा 'भावी मुख्यमंत्री'; पुण्यातील बॅनरमुळे चर्चांना उधाण

त्यानंतर वेअरमधून गोदापात्रात विसर्ग सोडण्यात आला. शनिवारी (ता.२३) सकाळी दहा वाजेच्या सुमारास १६ हजार ६५५ क्युसेकने विसर्ग गोदापात्रात विसर्ग सुरु होता. नंतर दुपारी ३ हजार १५५ क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आल्याने सद्यःस्थितीत वेअरमधून १३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता.

गोदापात्रात दीड लाख क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सोडल्यास पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. परंतु तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तालुक्यातील १७ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, संपूर्ण पावसाळा संपत आल्यानंतर गोदामाई पहिल्यांदा खळाळल्याने गोदाकाठावर पानी बघण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply