Chatrapati Sambhajinagar : यंदा आमची दिवाळी नाही; मराठा तरुणांच्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Chatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. यात सहभागी विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला. शिवाय यंदा दिवाळी साजरी न करण्याची शपथ घेण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मार्चला सुरुवात झाली. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक सरसावले.

Maratha Reservation : आमदार निवासाबाहेर मुश्रीफांची गाडी फोडली! वैजापूरहून आलेले तिघे ताब्यात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ कँडल मार्चचा समारोप करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, संशोधक, कर्मचारी, प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांना अधिसभा सदस्य डॉ. हरिदास सोमवंशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते डॉ. प्रकाश इंगळे, संशोधक कृती समितीचे अजय पवार,

राधा मोरे, कर्मचारी संघटनेचे नेते कैलास पाथ्रीकर यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, डॉ. तुकाराम सराफ, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. पंजाब पडूळ, नारायण पवार, लक्ष्मण नवले, डॉ. देवत सावंत यांच्यासह संशोधक, कर्मचारी, प्राध्यापक सहभागी झाले.

अशी आहे शपथ

डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी उपस्थित सर्वांना दिवाळी साजरी न करण्याची शपथ दिली. ती अशी : ‘राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही शपथ घेतो की, जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे आहोत. गेल्या महिन्यात अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी आम्ही साजरी करणार नाही.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply