Chandrayaan 3 update : चांद्रयान-३ चे लँडिंग 23 ऑगस्टला झाले नाही तर 27 ऑगस्टला चंद्रावर उतरेल ; इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Chandrayaan 3 update  : चांद्रयान-३ आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3ने आतापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सर्वकाही सुरळीत राहिलं तर लँडर मॉड्युल बुधवार 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. इस्रोकडून चांद्रयानाबाबत वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत.

ISRO ने पुन्हा एकदा चांद्रयान-3 चे आतापर्यंतची सर्वात मोठे अपडेट दिले आहे. चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याची तारीख 27 ऑगस्टपर्यंत देखील पुढे ढकलली जाऊ शकते.

अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल.
 
नीलेश देसाई यांनी सांगितलं की, लँडर 23 ऑगस्टला चंद्रापासून 30 किमी अंतरावरुन चंद्रावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी लँडरचा स्पीड 1.68 किमी प्रति सेकंद असेल. हा वेग खूप जास्त आहे. त्याआधी 2 तास आम्ही सर्व कमांड लँडर मॉड्युलला दिल्या जातील. सर्व काही तांत्रिक गोष्टी तपासू दोन तास आधीच आम्ही निर्णय घेऊ. 
मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे आम्हाला वाटलं तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू असंही देसाई यांनी सांगितलं. 27 ऑगस्टसाठीचीही आम्ही तयारी केली आहे. 27 ऑगस्ट पु्न्हा लँडिंगचा प्रयत्न केला तर की जागा दुसरी आहे. ही जागा ठरलेल्या जागेपासून 400 ते 450 किमी दूर असेल.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply