
Chandrayan 3 Update: चांद्रयान-३ मोहिमेचे मोठे अपडेट समोर आले आहे. आजचा दिवस हा या मोहिमेसाठी खूपच महत्वाचा आहे. चांद्रयान ३ चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहचले आहे. तसंच, प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. आता विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु झाला आहे. विक्रम लँडर हा यापुढचा प्रवास एकटाच करणार आहे. महत्वाचे म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचण्याची अंतिम तारीखही समोर आली आहे. विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतासाठी खूपच महत्वाचा राहणार आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 च्या चंद्राभोवतीच्या सर्व प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. शेवटची कक्षा 16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली. त्यानंतर इस्रोसाठी आजची दुपार खूपच महत्वाची होती. कारण आज चांद्रयानचे आतापर्यंत प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. चांद्रयान ३ एक एक टप्पा यशस्वीरित्या पार करत चंद्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता चांद्रयानच्या विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेचा अंतिम प्रवास सध्या सुरु झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, 23 ऑगस्ट रोजी फक्त विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. शास्त्रज्ञ टी.व्ही. वेंकटेश्वरन यांनी सांगितले की, रोव्हर लँडरच्या पोटात आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत पृथ्वीवरून लँडर आणि रोव्हरसह प्रवास केला आहे.
|
|
आज इस्रो वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. पहिली म्हणजे लँडर मॉड्यूलचे इंजिन आणि इतर गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत. वेगळे झाल्यानंतर लँडर त्याच्या पायावर उभा राहील म्हणजेच त्याची पूर्ण क्षमता आहे. दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे लँडर वेगळे झाल्यानंतर ते आता 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.
दरम्यान, जी प्रक्रिया आता घडत आहेत किंवा घडणार आहेत. ती चांद्रयान-2 दरम्यान देखील यशस्वीरित्या पार पडली होती. त्यावेळीही लँडर वेगळे होऊन चंद्राच्या दिशेने निघाले होते. पण २.१ किमीचे अंतर बाकी होते. त्यानंतर वेग नियंत्रित करता आला नाही आणि क्रॅश लँडिंग करण्यात आले होते. पण आता चांद्रयान ३ मोहिम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोकडून व्यक्त केला जात आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

