Chandrapur News : युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांना अटक

Chandrapur News : चंद्रपूरमधील  ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. सदर प्रकरणी ठाकरे गटातीलच अन्य ३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत.

शिवा वझरकर असं हत्या झालेल्या ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखांचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली. शिवा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्यांचा मृतदेह आढळला होता.

Nagpur News : नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आणि ३ आरोपी यांच्यात काही दिवसापांसून वैयक्तिक कारणावरून भांडणं सुरू होती. भांडणात मनात राग निर्माण झाल्याने शिवा यांना भेटण्यास बोलावून त्यांची हत्या करण्यात आलीये.

हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबींची तोडफोड करून संताप व्यक्त केला होता. हत्या केल्यावर तिन्हीही आरोपींनी तेथून पळ काढला. तसेच ते लपून बसले होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल रात्री अटक केलीये. रामनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply