Chandrakant Patil : टाळी एका हाताने वाजत नाही; भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटीलांचं मोठं वक्तव्य

Chandrakant Patil : कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं म्हटलं. त्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

टाळी एका हाताने वाजत नाही. घटनेची पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत घाईघाईने प्रतिक्रिया देणे हे एखाद्यावर अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात एस आय टी नेमलेली आहे त्यातून काय ते पुढे येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Beed News : पाणी टंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; हंडा, कळशी घेऊन नागरिकांचा बीड - परळी महामार्गावर 'रास्ता रोको'

शुक्रवारी (२ फ्रेब्रुवारी) उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश गायकवाड गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा

महेश गायकवाड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना एकूण ६ गोळ्या लागल्या आहेत. सोमवारी सकाळी कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply