Chandrabhaga River Water Pollution चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी,आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर

Chandrabhaga River Water Pollution : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मैला मिश्रित घाण पाण्यामुळे भाविकांसह नदीकाठच्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रात मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याने चंद्रभागेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पंढरपूर शहरातील मैला मिश्रित व घाण पाणी गोपाळपूर येथून सोडले जात आहे.गोपाळपूर येथून नदीपात्रातून साेडल्या जाणा-या मैला मिश्रित व घाण पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.\

Vasai Crime News : बायकोसोबत फ्लर्ट करायचा; नवऱ्याला राग आला, मित्राला संपवलं!

याबाबत प्रशासकीय अधिकारी देखील फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. आगामी काळात हाेणा-या वारीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथून गेल्या अनेक दिवसांपासून साेडले जाणारे हे पाणी शासन कशा प्रकारे राेखणार अथवा यावर काय उपाययोजना करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply