Champions Trophy : भारत-पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार? हायव्होल्टेज लढतीआधी दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीतील हायव्होल्टेज असा भारत-पाकिस्तान सामना रविवारी होत आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये होणाऱ्या लढतीकडं अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या काट्याच्या लढतीत भारत जिंकणार की पाकिस्तान याबाबत क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

 

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ 'फेव्हरेट' असल्याचं सौरव गांगुलीनं म्हटलं आहे. पाकिस्तान संघासमोर भारतीय संघाचं मोठं आव्हान आहे. त्यांना ही लढत इतकी सोपी जाणार नाही. भारतीय संघातील फिरकीपटू हे त्यामागचं कारण आहे. पाकिस्तानी संघाच्या फलंदाजांची फळी आहे, त्यामध्ये भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्याची तितकी क्षमता नाही, असंही गांगुली म्हणाला. भारतीय संघ केवळ पाकिस्तानविरुद्धच विजयी होणार नाही, तर चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, असा विश्वासही गांगुलीनं व्यक्त केला

भारत-पाकिस्तान सामन्याचं काउंटडाउन सुरू झालंय. दुबईत हा महामुकाबला होणार आहे. त्याआधी सौरव गांगुलीनं मोठा दावाही केलाय. टीम इंडियात एक नाही, तर पाच पाच शुभमन गिल आहेत. पीटीआयशी बोलताना गांगुलीनं भारतीय संघाच्या क्षमतेबाबत बरंच काही सांगितलं. गांगुलीच्या या वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण असं वक्तव्य करण्यामागचं कारणही गांगुलीनं स्पष्ट केलं. टीम इंडियात पाच शुभमन गिल आहेत, याचा अर्थ टीम इंडियात पाच असे खेळाडू आहेत, जे शुभमन गिलसारखे शतक झळकावून संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट

गांगुली असं का म्हणाला?

टीम इंडियात पाच शुभमन गिल आहेत, असं गांगुली म्हणाला. भारतीय संघाची टॉप ऑर्डर असं कारण या वक्तव्यामागं असल्याचं त्यानं सांगितलं. टॉपपासून मधल्या फळीपर्यंत जे फलंदाज आहेत, त्यांच्यात शुभमन गिलसारखी क्षमता आहे. गिलने बांगलादेशविरुद्ध जसं शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला, तशी क्षमता इतर खेळाडूंमध्येही आहे, असं गांगुली म्हणाला.

पठाणही म्हणाला टीम इंडिया फेव्हरेट

सौरव गांगुलीच काय, तर भारताचा माजी तेजतर्रार गोलंदाज इरफान पठाणनंही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. पाकिस्तानच्या सध्याच्या संघात नसलेला तालमेल हे यामागचं कारण पठाणनं सांगितलंय. पाकिस्तान संघाकडे आक्रमक अंदाज नाही. आताच्या क्रिकेटला तेच हवंय. आताचा संघ बघता पाकिस्तानपेक्षा भारतीय संघाची क्षमता अधिक दिसतेय. भारतीय संघ दबाव चांगल्या रितीनं हाताळू शकतो, असंही पठाण म्हणाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply