Champa Shashthi 2023 : यळकोट, यळकोट जयमल्हार! जेजुरी गडावर 'चंपाषष्ठी' उत्सवाची सांगता; प्रती जेजुरीत भाविकांची गर्दी

Champa Shashthi 2023 : आज चंपाषष्टी निमित्ताने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. या दिवशी खंडेरायाचे दर्शन घ्यायला जेजुरी गडावर लाखो भाविक हजेरी लावतात. तसेच प्रती जेजूरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथेही खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ आहे.

 येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष करत अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असणाऱ्या वाकडी येथे राज्यभरातून आलेले लाखो भाविक खंडोबा चरणी नतमस्तक झाले. याठिकाणी भंडा-याची उधळण करत देवाची तळीआरती केली जाते. देवाला वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य भाविक अर्पण करत असतात.

Salim Kutta : नितेश राणे वेडा आहे, तो सलीम कुत्ता कधीच मेलाय; आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल

काय आहे आख्यायिका?

जेजुरीहून निघाल्यानंतर खंडोबा देवाचा पाचवा मुक्काम वाकडी येथे झाला. वाकडीत पाण्याची सोय नसल्याने प्रधानजींना त्यांनी चंदनापुरी येथे पाणी आणण्यासाठी पाठवले. पाण्याची उपलब्धता नसल्याने सर्व सैन्य त्यांनी जेजुरीला परत पाठवले. मात्र जाताना घोड्यांच्या माना वाकड्या झाल्याने या जागेला वाकडी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे प्रत्येक चंपाषष्टीला मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात.

जेजुरी गडावर चंपाषष्ठीची सांगता..

दरम्यान, चंपाषष्ठी निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावरही राज्यभरातील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. जेजुरी गडावर चंपाष्टमीला हळद आणि पोष पौर्णिमेला पाल येथे देवाचे लग्न होते. आज सोमवार रोजी चंपाष्टमी उत्सवाची सांगता होत आहे. या निमित्ताने जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply