Central Railway Special Train: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राज्यात धावणार आणखी २४ विशेष गाड्या, कोणत्या जिल्ह्यातून ट्रेन जाणार?

image

सीएसएमटी ते कोल्हापूर दरम्यान ६ विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 01029 आणि 01030 या गाड्या १३.०२.२०२६, १८.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ या ठरावीक तारखांना धावणार असून, दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली आणि मिरज यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य डबे उपलब्ध असणार आहेत. ट्रेन क्रमांक 01029 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01030 विशेष १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दुपारी १५.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *