CBI Action In Nashik : नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई; दोन लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तांसह दोन जण ताब्यात

CBI Action In Nashik :  नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन  लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच  घेताना कारवाई केली आहे. 

नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईपीएफओ अधिकार्‍याने खाजगी पीएफ सल्लागारासोबत अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराला खाजगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला. 

Maratha Reservation News : पोलिसांच्या नोटीसा, तरीही मराठा बांधव ठाम; मनोज जरांगेंसोबत ५०० ते ७०० ट्रॅक्टर मुंबईत नेणारच

१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

या प्रकरणी सीबीआयने सापळा रचून एक व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आली. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply