Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला; '20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले

शिंदे-फडणवीस सरकारला काही दिवसात सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यामध्ये एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक प्रयत्न होत आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. पण यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली आहे.

याबाबतची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगतानाच त्यांनी विस्ताराची तारीख देखील सांगितली आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे.

येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर 20 ते 22 तारखेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असं संजय शिरसाट यांनी म्हटंलं आहे.

बोलताना त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात ठाकरे गट रिकामा होणार आहे. ठाकरे गटाचे उरलेले आमदार 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेत जो सकाळचा भोंगा सुरू आहे त्यामुळे शिवसेना रिकामी होणार आहे. भविष्यात निवडणुका लढवयाच्या की नाही असा प्रश्न उध्दव ठाकरे समोर उभा राहील, असंही संजय शिरसाट यांनी म्हटंलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply