Bus Accident : टायर फुटलं, चालकाचं नियंत्रण सुटलं; मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

Bus Accident On Mumbai Goa Highway : भरधाव वेगात असलेल्या खासगी बसचं टायर फुटून मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. या भीषण अपघातात बसमधील ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर चांडवे गावाच्या हद्दीत हा खासगी लक्झरी बसला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. हा अपघात मध्यरात्री पावणे ३ वाजण्याच्या सुमारास झाला.

रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या या बसमध्ये अपघातादरम्यान 22 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी 7 प्रवाशांना दुखापत झाली असून यातील ४ जण गंभीर जखमी आहे. या चारही प्रवाशांना 4 पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे, तर किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये प्रथोमोपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply