Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहतूक, अवैध पार्किंग देतेय अपघाताला आमंत्रण

Bulldhana : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठा द्रुतगती महामार्ग आहे. या महामार्गावर वाहने वेगाने धावत असतात. यामुळे बरेच अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे चित्र असताना देखील समृद्धी महामार्गावरील डोणगावजवळ अवैधपणे पार्किंग केली जात असून बेशिस्त वाहतुकीने येथे अपघाताला आमंत्रण दिले जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी आहे. या महामार्गावर वाहनांची वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर प्रति तास असते. अर्थात कमी वेळात जास्त अंतर कापण्याचा वाहन धारकांचा प्रयत्न असतो. मात्र आता याच महामार्गावर बेशिस्त वाहतूक व अवैध पार्किंग पुन्हा एकदा अपघाताला निमंत्रण देणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गाच्या कडेला मोठे ट्रक उभे केले जात आहेत.

महामार्गाच्या लेनमध्ये वाहने

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील डोणगाव परिसरात अनेक अवैध स्टॉल्स आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी ट्रक आणि जड वाहतूक करणारे वाहने समृद्धी महामार्गाच्या लेनमध्येच पार्क केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. सध्या समृद्धी महामार्ग नागपूर ते इगतपुरीपर्यंत सुरू झाला आहे. मात्र कुठेही अशा प्रकारची पार्किंग होताना दिसत नाही. मात्र डोणगाव जवळच नेमकं काय आहे? की त्यामुळे या ठिकाणी सर्वच वाहने थांबतात.

समृद्धी महामार्गावर अशा पद्धतीने वाहने उभी केली जात असताना पोलिस प्रशासन, परिवहन विभाग आणि समृद्धी महामार्ग प्रशासनाने हा सर्व प्रकार थांबविणे गरजेचे आहे. अर्थात या सर्व प्रकारामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे व अवैध पार्किंगमुळे मात्र या परिसरात मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली असून बेशिस्तपणे उभी करण्यात येणारी वाहने थांबू नये; असे प्रयत्न होणे गरजेचे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply