Buldhana ST Bus Accident : बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात, ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली, मदतकार्य सुरू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस राजूर घाटात कोसळली. या भयानक अपघातात बसमधील २० ते २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजूर घाटाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदकार्य सुरू केलं असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी राजुर घाटात एसटी महामंडळाच्या बसचे पूढील टायर फुटल्याने बस उता-यावर (पाठीमागे) जाऊ लागली.चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ताेपर्यंत बसने रस्ता साेडला आणि एका खड्य्यात पलटी झाली.

या अपघाताची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Meghalaya CMs Office Attack : मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचा हल्ला, 5 सुरक्षा कर्मचारी जखमी

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या बसमधील जवळपास वीस विद्यार्थ्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत. राजुर, मोताळा तारखेड येथील हे विद्यार्थी बुलढाणा येथे शाळेसाठी येत हाेते. काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनधारकांनी पुढील प्रवासासाठी मदत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply