Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस! वीज पडल्याने १४ शेळ्या दगावल्या; शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

Buldhana Rain News : राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचा  कहर पाहायला मिळत आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालासह अनेक ठिकाणी जिवीतहानी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून अशीच एक दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात वीज पडून १५ शेळ्या दगावल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून काही भागात विजेच्या कडकडाट सह वादळी पाऊस पडत आहे. आज सकाळी 10 वाजतांच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील रताळी गावातिल् भिकाजी सखाराम जाधव हे स्वतःच्या शेळ्या परिसरातील शेतात चारायला गेले होते. मात्र मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडाट सुरु होता.

याचवेळी शेतातील एका लिंबाच्या झाडावर विज कोसळली. त्याच लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या 14 शेळ्या होत्या. त्या सर्व शेळ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे भिकाजी जाधव यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

ओढ्याच्या पुरात वाहून तरुणाचा मृत्यू....

दरम्यान, काल लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. या पावसामुळे ओढ्याच्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची दुर्देवी घटना लातूरच्या देवणी तालुक्यात समोर आली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडली होती. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply