Buldhana : शेतक-यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? 'वंचित'सह ठाकरे गटाचा बुलढाणा प्रशासनास सवाल, आंदाेलनाचा इशारा

Buldhana : ढगफुटी, गारपीट आदी कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईची रकक्म अद्याप शेतक-यांना मिळाली नसल्याने राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीआणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा प्रशासनास तातडीने शेतक-यांना नुकसान भरपाईचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 

अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही

पंचनामे होऊन वर्ष होत आले तरी अद्याप एकालाही नुकसान भरपाई मिळाली नाही. वारंवार शासनास निवेदने देऊन थकलाे असे शेतक-यांनी नमूद केले. आता 5 मार्चपर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, आर्थिक मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचा इशारा

खरीप आधीच हातचा गेलेला असताना रब्बी हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. मात्र जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मायबाप शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांना थेट खात्यात आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अन्यथा जिल्हा शिवसेनेच्या  वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply