Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हा; खामगावात काढला होता मोर्चा

Buldhana News : बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी १ जानेवारीला काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान पोलीस प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन करत घोषणाबाजी केली. ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या १५० शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी १ जानेवारीला खामगावात ट्रॅक्टर मोर्चा आणला होता. सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी अडविला होता. त्यामुळे शेतकरी व पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला व अर्धनग्न आंदोलन सुरू केले होते. तसेच सरकार व पोलिसांबाबत घोषणाबाजी केली. 

Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या बापाकडून मुलीवर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

१५० शेतकऱ्यांवर गुन्हे 

या प्रकरणी शहर पोलिसांनी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवाजीराव उर्फ रावसाहेब टीकार पाटील व त्यांची पत्नी, संदीप शिवाजीराव टीकार पाटील, बंडू शिवाजीराव टीकार पाटील, बाळू खरात, मारोती तायडे, आनंद सुरवाडे, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर टीकार, हिम्मत सुरवाडे व शाम अवथळे यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply