Buldhana News : मेहेकर तालुक्यातील शेतकरी संतप्त, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पॉवर हाऊस कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदाेलन

Buldhana News : पीक सुकत आहेत लाईन द्या! अशी मागणी मेहेकर तालुक्यातील जानुना, राजगड, विठ्ठलवाडी, बेलगांव, पागरखेड या गावातील शेकडो शेतक-यांनी पॉवर हाऊस येथील कार्यालय अधिकारी कार्यालयास केले. असंख्य शेतकऱ्यांनी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील सुरु केले आहे. 

डोणगाव विद्युत वितरण विभागाच्या भाग एक मधील जनूना, राजगड, विठ्ठलवाडी, बेलगाव, पागरखेड शेतकऱ्यांच्या सोबतच गावातील जनता विद्युत वितरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

Samruddhi Mahamarg : मेहकर टोल नाका केला कर्मचाऱ्यांनी बंद; दोन महिन्यापासून पगार नसल्याने संतप्त

शेतातील रब्बी पिके सुकायला लागली आहेत. विहिरीत थोडेफार पाणी आहे मात्र पाणी देण्यासाठी विज नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत डोनगाव विभागातील सर्व गावातील विज सुरु करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply