Buldhana News : बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा! एलसीबीची कारवाई, ३१ हजार लिटर साठ्यासह ३४ लाखांचा मुद्धेमाल जप्त

Buldhana News : राष्ट्रीय व राज्य मार्गालगत राजरोसपणे अवैध बायो डिझेलची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल ३१ हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. यात ३४ लाखांचा मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

चिखली  एमआयडीसी, मलकापूर व दसारखेड एमआयडीसी येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३१ हजार ४०५ लिटर अवैध बायोडिझेलसह एकूण ३४ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथील किसान बायोडिझेल, काठोडे ट्रेडर्स, मलकापूर  येथील हॉटेल निसर्ग व हॉटेल सहयोगजवळ, पद्मने महाराज शेताजवळ, हॉटेल अमनजवळ छापे घालण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

Akola News : दूषित पाणी पिल्याने २ महिलांचा मृत्यू; कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा आरोप

आठ जण ताब्यात 

या प्रकरणी आरोपी सचिन लोखंडे, ज्ञानेश्वर काठोडे (रा. चिखली), नफीस खान (वडणेर भोलजी नांदुरा), हेमंत काचकुरे (तालासवाडा मलकापूर), परमेश्वर वनारे (माकनेर, ता. मलकापूर), शेख जावेद, मोहमद जिया मो युसूफ, गुरफान खान गफार खान (रा. मलकापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध भादवी कलम २८५, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply