Buldhana Paper Leak : बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी शिक्षक अधिकाऱ्यांची मोठी कारवाई

Buldhana Paper Leak : बुलढाणा येथे बारावीचा गणिताचा पेपर फूटी प्रकरणी शिक्षक अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. चार आरोपी शिक्षकांच निलंबन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आलं आहे. 

बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. चार दिवसंपूर्वी गणिताचा पेपर झाला. मात्र, बुलढाणा येथे सिंधखेड तालुक्यातील एका खाजगी शाळेत गणिताचा पेपेर फुटला. गणिताच्या पेपरची दोन पाने ही व्हॉटसअपवर व्हायरल झाले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी मोठी कारवाई करत आरोप शिक्षकांचे निलंबन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक हे विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तिथेच शिक्षक म्हणून कार्यरत होते.

तर अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होते. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या पेपरफूटी प्रकरणी शिक्षक असल्याचे पुढे आले असून आता पर्यंत सात जणांना टक करण्यात आली आहे.

पेपर फुटीचा संबंध हा थेट मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये देखील गणिताच्या पेपरचा काही भाग आढळला आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply