Buldhana Crime : बुलडाणा हादरले! वसतीगृह अधीक्षकाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, आईला सांगितल्याने जबर मारहाण

Buldhana : बुलडाण्यामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ५२ वर्षीय वस्तीगृह अधीक्षकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहामध्ये ही घटना घडली आहे. या घटनामुळे बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संत ज्ञानेश्वर वसतीगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय मुलावर याच वसतीगृहाचे अधीक्षक असलेला विनायक देशमुखने (५२ वर्षे) लैंगिक अत्याचार केले.

Tiger Death : पट्टेरी वाघ आढळला मृतावस्थेत; १३ नखे, २ दात गायब, उकणी कोळसा खाण परिसरातील घटना

वसतीगृहाचा अधीक्षक गेल्या दोन महिन्यांपासून या मुलावर लैंगिक अत्याचार करत होता. इतकच नाही तर मुलाने आपल्या आईला फोनवरून माहिती दिल्याच्या कारणाने या अधीक्षकाने या अल्पवयीन मुलाला जबर मारहाण केली आहे. या विद्यार्थ्याच्या आईने अमडापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक देशमुख यांच्याविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.

चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर वसतीगृह आहे. हे वसतिगृह शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येते. याच वसतीगृहात विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. अशाच प्रकारचा अत्याचार या अधीक्षकाने इतर अनेक मुलांवर केल्याची चर्चा सुरू आहे. वसतीगृहात कुणीही सुरक्षारक्षक नव्हते . त्यामुळे आता शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या झालेल्या प्रकारामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply