Buldhana Clash : बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठाकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Buldhana Clash : राज्यात सर्वत्र होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी सणानिमित्त शहर, गावातील सर्व मंडळी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील लोकांनी होळी दहनाची तयारी केली आहे. मात्र, बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा झाला आहे. बुलडाण्यातील विठ्ठलवाडीमध्ये होळी दहनाच्या वेळी दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली. या गावातील दोन गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी लहान मुलांचं भांडण झालं. या लहान मुलांच्या भांडणावरून गावातील दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हाणामारीत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Mumbai : फिरायला गेले अन् खदानीत बुडाले; एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा बेपत्ता, दहिसर पूर्वेकडील घटना

होळी दहनाच्या वेळी झालेल्या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

या हाणामारीतील १७ जण जखमी झाले आहेत. या जखमींना मेहेकर येथील ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं. तर 5 जण गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना केलं आहे. विठ्ठलवाडी गावात पोलिसांचं दंगाकाबू पथक पोहोचले आहे. सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. गावात तणावपूर्ण शांताता असून डोनगाव पोलिसांत तक्रार देण्यासाठी दोन्हीकडील मंडळी पोहोचली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply