Buldhana News : बुलढाण्यात ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी तर ८ गंभीर

Buldhana News : बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. किनगाव राजाजवळ जुन्या मुंबई नागपूर मार्गावर एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल पुण्याहून नागपूरकडे जात होती. ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस असल्याची माहिती मिळतेय. चालकाचं ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजाजवळ हा अपघात आज (६ जून) सकाळी साडेपाच वाजेदरम्यान झाला आहे. जुन्या मुंबई नागपूर मार्गावर ही बस डाव्या बाजूने पलटी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडला येत नव्हते. प्रवासी सुमारे एक तास या अपघातग्रस्त बसमध्ये अडकले होते. या बसला आकस्मित असलेले मागील बाजूने दार नसल्याने प्रवासी अडकल्याची माहिती मिळतेय.

Pimpri Chinhcwad : ऑनलाइन टास्क देत 20 कोटींचा घातला गंडा, सायबर गुन्हे शाखेने 8 जणांना ठाेकल्या बेडया

समृद्धी महामार्गावर झालेल्या जळीत खाजगी बसच्या अपघाताची पुनरावृत्ती गावकऱ्यांच्या सतर्कतेने टळल्याचं पाहायला मिळालं आहे. तर या अपघातातील  जखमींना सिंदखेड राजा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बसमधील एकूण ३० प्रवासी जखमी झाले होते. त्यातील ८ गंभीर जखमी आहेत. त्यामुळे त्यांना जालना येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलंय.

या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं  होतं. बस पलटी झाल्यानंतर त्यांना स्थानिकांनी मोठी मदत केल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. परिसरात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा अपघात मात्र वाहन चालकांच ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं समोर आलं आहे. भरधाव वेगामुळे अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. परंतु या अपघातात अद्याप कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply