Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Buldhana Accident :  अवैध रेती वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर पुणे महामार्गावर रात्रीच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करत डंपर भरधाव वेगाने रस्त्यावर धावतात. यातच हा अपघात झाला आहे. अवैध रेती वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण  गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा येथे घडली. 

Pune Breaking : '२५ लाखांची खंडणी द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू'; पुण्यात भाजप नेत्याला धमकीचा फोन

जखमींची प्रकृती गंभीर 

सदर अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णाल्यात  भरती करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने हटविण्यात आली असून रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply