Buldhana Accident : अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

Buldhana Accident : बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अंत्यसंस्कारावरून परताणाऱ्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती  मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नांदुरा खामगाव दरम्यान भरधाव ट्रकने रिक्षाला धडक  दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वाहनांचा चक्काचूर झालाय. तर आठजण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Shirur Lok Sabha : शिरूरमध्ये प्रचारावरून वातावरण तापलं; अमोल कोल्हेंचा हल्ला, तर आढळरावांचा प्रतिहल्ला

प्रकृती चिंताजनक असलेल्या जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. शेगाव येथून मलकापूरकडे अंत्यसंस्करासाठी रिक्षाने जात असताना हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती.

हिंगोलीमध्ये अपघात

हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ २७ एप्रिल रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात ज्ञात वाहनाच्या धडकेत  दोन तरूणांनी त्यांचा जीव गमावला होता. हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली होती. वैभव पाटील आणि शुभम पारसकर, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे होती.

हे तरुण खासगी कामानिमित्त सेनगाव मध्ये गेले खाजगी कामानिमित्त हिंगोलीवरून सेनगावला गेले होते. हिंगोली शहराजवळ असलेल्या  राहुल पाटीजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी त्यांचे मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply