Buldhana Accident : मिनी ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Buldhana : भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खामगाव येथे घडली. तर अन्य एकजण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातानंतर रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती.

इरफान शाह लुकमान शाह (वय ४८) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या अपघातात एकजण जखमी झाला असून त्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत इरफान शाह हे रफुद्दीन शहाबुद्दीन जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल येथे शिक्षक होते. इरफान शाह हे रोजप्रमाणे (Khamgaon) खामगांववरुन दुचाकीने पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात होते. याच दरम्यान मिनी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Dharashiv News : गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; तरीही धाराशिव जिल्ह्यातील धरण कोरडीठाक

नातेवाईकांचा आक्रोश

खामगाव- पिंपळगाव राजा या रस्त्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिंकानी गर्दी केली होती. तर अपघाताची माहिती कुटुंबियांना मिळताच रुग्णालयात धाव घेतली. इरफान शाह यांचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply