Budget 2024 Cheap and Expensive : सोनं खरेदीदारांची 'चांदी', दागिन्यांसह मोबाईलचे दरही घटणार, काय स्वस्त काय महाग?

New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ चे  वाचन केले. मध्यमवर्ग, युवा, महिला, शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस करण्यात आला. सर्वसामान्यांशी निगडित मोबाईल फोन, मोबाईल चार्जर या वस्तू स्वस्त होणार आहेत. तर आयात शु्ल्कात घट झाल्यामुळे सोनं चांदी स्वस्त होणार आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी आतापासून सोने चांदीचे दागिने खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांची 'चांदी' होणार आहे.

विशेष म्हणजे कॅन्सरवरील तीन महत्त्वाच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांची औषधं स्वस्त होऊन दिलासा मिळणार आहे.

मोबाईल स्वस्त

मोबाईल चार्जरच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी होणार आहेत. मूळ सीमा शुक्लात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी करात सवलत देण्यात आली आहे. मोबाईल बीसीडी, मोबाईल पीसीबीए, चार्जरच्या किमती स्वस्त होणार आहेत.

Budget 2024 : नितीश कुमार-चंद्राबाबूंचा मोदींना पाठिंबा, त्याबदल्यात भरभरून निधी पण महाराष्ट्राला दुय्यम वागणूक, वडेट्टीवारांचा अर्थसंकल्पावर संताप

सोने-चांदीचे दर घटणार

सोने चांदी आयात कर साडेसहा टक्क्यांवरुन सहा टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोने चांदी स्वस्त होणार आहे. याशिवाय खनिज उत्पादनांच्या निर्यातीत सवलती देण्यात आली आहे. पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत मिळणार आहे.

काय स्वस्त?

मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जर स्वस्त होणार
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरील तीन महत्त्वाची औषधं कमी दरात मिळणार
सोने चांदी स्वस्त, पर्यायाने सोन्याचे आणि चांदीचे दागिनेही स्वस्त
सोलर सेट कमी दरात मिळणार
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती घटणार
लिथियम बॅटरी
एक्स रे मशीनच्या किमती कमी होणार
माशांपासून बनवलेली उत्पादनं
चामड्याच्या चपला, शूज आणि पर्स
परदेशातून आयात दागिने स्वस्त होणार

काय महाग?

प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार, त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू महाग
सिगरेट
विमान प्रवास
पेट्रोकेमिकल

मागील वर्षांप्रमाणेच, यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरुपात सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी किरमिजी रंगाची सिल्क साडी नेसली होती. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर पारंपारिक 'ब्रीफकेस' घेऊन अधिकाऱ्यांच्या टीमसोबत फोटोसाठी पोज दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply