BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई

BS Yediyurappa News :

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीआणि भाजपचे वरिष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी कलमांर्तग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एफआयआरमधील माहितीनुसार, एका १७ वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी याबाबत तक्रार दाखला केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी येडियुरप्पा यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही.

Sanjay Raut : निवडणूक आयुक्तांची नियुक्ती अन् संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

पीडित मुलगी आणि तिची आई एका फसवणूक प्रकरणात येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती एफआयआरमध्ये आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आलं आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने जवळपास ५३ प्रकणांची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये संबंधित महिलेने वेगवेगळ्या प्रकरणात अशाच प्रकारे तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.

कोण आहेत बीएस येडियुरप्पा?

बीएस येडियुरप्पा २००८ आणि २०११ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर मे २०१८ मध्ये आणि पुन्हा जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २०२१ त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाची आपला निर्णय जाहीर करताना येडियुरप्पा मंचावर रडले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply