BRT मार्गात खासगी वाहनांना प्रवेशबंदी; अपघात रोखण्यासाठी PMPML कडून बूम बॅरियर्स

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी (BRT) मार्गामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी पीएमपीएमएल ने बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्वावर बूम बॅरियर लावले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी ते काळेवाडी फाटा ह्या बीआरटी मार्गावर हे बूम बॅरियर लावण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश आहे. मात्र, ह्या स्मार्ट सिटीतील बीआरटी मार्गाचे काम स्मार्ट पद्धतीने चालत होते. बीआरटी मार्गावर मॅन्युअल सेक्युरिटी गार्ड रोप हँडलिंग होत असल्याने, बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने घुसुन जीवघेणे अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी पीएमपीएमएलने बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्वावर बूम बॅरियर लावले आहेत.
बूम बॅरियर बॉक्समध्ये एक कंप्यूटरसोबत एक सिसिटीव्हीकॅमेरा देखील लावण्यातआला आहे. ह्या कंप्यूटर मध्ये पीएमपीएमएलच्या सर्व बसेसचा नंबरसहित डाटा लोड करण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे बीआरटी मार्गावर आता फक्त बीआरटी बसेस व्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply