Bridge Collapse : बिहारमध्ये 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनापूर्वीच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ब्रीज कोसळला,

Bridge Collapse : बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल दुर्घटना घडली आहे. येथे उद्घाटनापूर्वीच पूल नदीत कोसळला. ही घटना अररिया जिल्ह्यातील सिक्टरी परिसरात घडली. येथे बाकरा नदीच्या पडरिया घाटावर करोडो रुपये खर्चुन बांधलेला पूल अचानक नदीत कोसळला.

हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. 182 मीटर लांबीचा हा पूल तीन भागात बांधण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप लोक करत आहेत, त्यामुळे उ‌द्घाटनापूर्वीच पूल कोसळला.

Solapur : पंढरपूर- कराड रोडवर सात महिलांना ट्रकने चिरडले ! रस्त्यावर एसटी बसची वाट पाहात थांबलेल्या 7 पैकी 5 महिलांचा जागीच मृत्यू

प्रधानमंत्री ग्रामीण सडक निर्माण योजनेतर्गत बांधण्यात आलेल्या या पुलाची किंमत ७.७९ कोटी रुपये होती. 182 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले.

सुरुवातीला यासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता, मात्र नंतर नदीचा मार्ग आणि अप्रोच रोड बदलल्याने एकूण खर्च वाढून 12 कोटी रुपये झाला.

पुलाच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे त्यावरून वाहतूक होत नव्हती. एकूण बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. गेल्या दोन दिवसापासून पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मगळवारी हा पूल अचानक फोसळला.

पूल दुर्घटनेनंतर खासदार प्रदीपकुमार सिंह आणि भाजपचे आमदार विजय कुमार मंडल यांनी हा निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

खासदार व आमदारांनी पुलाच्या पाइलिंगच्या अनियमिततेबाबत बोलून ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय पथकाकडून चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply