Breaking News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणं भोवलं, नाशिकमध्ये ४२ जणांवर तडीपारीची कारवाई

Breaking News : नायलॉन मांजा विक्रीस बंदी असताना प्रशासनाचे आदेश झुगारून सर्रास मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना नाशिक पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. शहरातील तब्बल ४२ मांजा विक्रेत्यांना तडीपार करण्यात आलं आहे. शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो. मांजामुळे अनेकजण जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहे. यामध्ये काहींना प्राणही गमवावे लागत आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Nagpur News : नागपुरातील रामन विज्ञान केंद्राला उडवून देण्याची धमकी

या पार्श्वभूमीवर राज्यभरात मांजा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी देखील २३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर मनाई आदेश जारी केले आहेत. तरी देखील शहरात छुप्या पद्धतीने मांजाची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, नायलॉन मांजा विक्री करताना सापळ्यात सापडलेल्या ४२ संशयित विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील ४२ जणांचे तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये आडगाव परिसरात ३, म्हसरूळ २, पंचवटी, २, भद्रकाली ५, सरकारवाडा ८, गंगापूर ५, मुंबईनाका ५,सातपूर १, अंबड २, इंदिरानगर ३, उपनगर ३, नाशिकरोड २, देवळाली कॅम्प परिसरातील एका जणाचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply