Breaking News : राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवादी ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Breaking News : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार, ९ डिसेंबर) सकाळपासून एनआयए एकूण 44 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी ( ९ डिसेंबर)  राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने  राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

Nagpur DCC Bank Scam : नागपूर जिल्हा बँक घोटाळा; खात्यांतर्गत चौकशीला सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ

या कारवाईत भिवंडीच्या  पडघा  गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून  दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply