Brand Ambassador : मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतील मुलीचं नशीब उजळलं; मलिशा बनली आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा

Mumbai News : मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचं नशीब पालटलं आहे. या मुलीची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. मलिशा खारवा असे १४ वर्षीय मुलीचे नाव आहे. 

हॉलीवूडमधील अभिनेते रॉबर्ट हॉफमॅन यांनी २०२० साली मालिशाला शोधलं. रॉबर्ट हा एका गाण्याच्या शुटिंगसाठी मुंबईत आला होता. यावेळी त्याने मलिशाचं इन्स्टाग्रामचं खात देखील उघडून दिलं होतं. मलिशाचे इन्स्टाग्रामवर २ लाख २५ हजार फॉलोवर्स आहेत.

धारावीत राहणारी मलिशा मॉडेलिंग देखील केली आहे. मलिशाने 'लिव योर फेयरीटेल' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. मलिशाचं लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

फॉरेस्ट इसेंशियल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, 'मलिशा ही फॉरेस्ट इसेंशियल्सच्या स्टोरमध्ये स्टोर करत आहे. या स्टोरमध्ये तिचे फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply