BMC Mayor Election : महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार का?

Mumbai : फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंचा पक्ष मुंबई महापालिकेत भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवारांला पाठिंबा देणार असल्य़ाची चर्चा सुरु झाली. भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी तर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हणत या चर्चांना आणखीनच हवा दिली. मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे? पाहूयात.

मुंबई महापालिकेत भाजपचे 89, शिंदेसेनेचे 29 राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महायुतीकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र मनसेच्या 6 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिल्यास एकूण संख्याबळ 127 होईल. तर दुसरीकडे ठाकरेसेनेचे 65, काँग्रेसचे 24, एमआयएमचे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, समाजवादी पक्षाचे 2 असे विरोधकांचे एकूण संख्याबळ 100 आहे.

Mumbai : मुंबई हादरली; ३६ तासांत १२ मुले बेपत्ता; मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा संशय?


खर तर या चर्चेंमागे राज ठाकरेंची वेळोवेळी बदलत जाणारी भूमिकाच कारणीभूत ठरली असावी. मात्र खुद्द राज ठाकरेंनीच भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय.मुंबई महापालिकेत भाजपसोबत जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेचा गड सर करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावलीय. आता मुंबईत भाजपचा महापौर सत्तेत बसणार हे निश्चित आहे. तरीही भविष्यात मुंबईतील राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजप कोणती खेळी खेळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “BMC Mayor Election : महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *