BMC Election: ठाकरे-भाजपमध्ये हनुमानवरून युद्ध; मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हिंदुत्वावरून लढाई

Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपात युद्ध सुरू झालंय. त्याला कारण ठरलीय रेल्वेने दादरच्या 80 वर्षापुर्वीचं मंदिर हटवण्याची दिलेली नोटीस. त्यावरून ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्व नकली असल्याची टीका करत हिंदुत्वावरून भाजपला घेरलं. आदित्य ठाकरेंनी थेट या मंदिरात महाआरतीची घेषणा करून भाजपला आणखीनच अडचणीत आणलं.

त्यामुळे गोची झालेल्या भाजपनं रेल्वे प्रशासनाकडे धावाधाव केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ही नोटीस रद्द केली. यामुळे भाजपनं ठाकरेंना काटशह दिल्याची चर्चा रंगली. मात्र भाजपचं हिंदुत्व नकली असून निवडणुकीपूर्व असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून त्यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात येत होती. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट व्होट जिहादमुळे जिंकल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता.

Maharashtra Cabinet Expansion 2024 : नितेश राणे ते माधुरी मिसाळ, भाजपचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला जात आहे. त्यामुळेच महापालिकेत मविआतून बाहेर पडण्याचे संकेत देत ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषाही करत आहे. मात्र मुंबईकरांना ठाकरेंचं हिंदुत्व रुचणार की भाजपचं हिंदुत्व भावणार याचीच उत्सुकता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply