BMC : मुंबई महापालिकेची क्लीनअप मार्शल सेवा होणार बंद; रस्त्यावर कचरा करणाऱ्यांवर कोण करणार कारवाई?

BMC : येत्या काही दिवसांत मुंबईतील क्लीनअप मार्शल सेवा ही पूर्णपणे बंद होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या, रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ही सुविधा सुरु केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही सुविधा सुरु केली होती. आता ५ एप्रिलपासून क्लीनअप मार्शल हटवले जाणार आहे.

यासंदर्भात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटने एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव बीएमसी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. क्लीनअप मार्शल सेवा बंद झाल्यानंतर मुंबईत कचरा करणाऱ्या लोकांवर कोण नियंत्रणा ठेवणार असं विचारलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १२ प्रायव्हेट एजन्सीद्वारे त्यांच्या २४ वॉर्डमध्ये क्लीनअप मार्शल नियुक्त केले होतेय. हे लोक रस्त्यावर घाण पसरवणाऱ्या लोकांकडून १०० ते १००० रुपयांपर्यंत दंड आकारायचे. परंतु या नावाखाली लूटमार आणि खंडणीच्या तक्रारी येऊ लागल्या. यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 


मुंबईत गेल्या ११ महिन्यात जवळपास १.४५ लाख लोकांवर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. यातून ४.५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आले आहे.
२००७ साली पहिल्यांदा क्लीनअप मार्शल सुरु करण्यात आले होते. २०११ मध्ये हे पुन्हा बंद करण्यात आले. कोरोनामध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.२०२४ मध्ये योजना पुन्हा सुरु करण्यात आली होती. मात्र, आता ही योजना बंद होणार आहे.या योजनेचा मागील वर्षी झालेला करार ४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे ५ तारखेपासून ही सेवा बंद होणार आहे. यामुळे आता रस्त्यावर थुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्या लोकांना कोण आळा घालणार असा प्रश्न विचारला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply