BJP Split : भाजपमध्ये फूट, आता नवनिर्वाचित महापौरांसह बंडखोरांवर कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

image

महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपमध्ये भिवंडीत फूट पडली. भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडीआधी भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या गळाला लागले. हा भाजपला सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. महापौर निवडीआधीच बंडखोरी केलेले नारायण चौधरी हे महापौर झाले. त्यांच्यासह इतर काही नगरसेवकांनीही काँग्रेसला साथ दिली. आता महापौर नारायण चौधरी यांच्यासह ज्या नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केली, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.

काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

भिवंडीत भाजपमध्ये उभी फूट पडली. याची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नारायण चौधरी आणि इतर भाजपचे नगरसेवक आहेत, जे कदाचित बंडखोरी करतील असं लक्षात आलं; तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाच्या विरोधात गेलात तर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यांना समजावण्याचा अनेकांनीही प्रयत्न केला, असे चव्हाण म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *