Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार

Bhiwandi Crime News : सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. २० वर्षीय पीडित नवविवाहीत सुनेवर सासऱ्यासह त्याच्या मित्राने बलात्कार केला आहे. आधी खोलीत डांबून ठेवलं आणि आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत, आरोपींनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरूणी मुळची राजस्थान राज्यातील आहे. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तिचं नुकतंच लग्न झालं होतं. दरम्यान ३० जानेवारीला ४२ वर्षीय नराधम सासरा पीडित सुनेला वडिलांकडे सोडण्याच्या बहाण्यानं भिवंडीत स्वतःच्या घरी घेऊन गेला.

Champions Trophy : पाकिस्तानकडून ब्लंडर! ऑस्ट्रेलिया-इंग्लंडदरम्यान वाजवलं भारताचं राष्ट्रगीत

त्या खोलीत पीडितेला डांबून ठेवलं. नंतर तिच्यावर सासऱ्यासह त्याच्या मित्रानं ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वारंवार बलात्कार केला. हा सर्व प्रकार १५ दिवस सुरू होता. आई - वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत नराधम सासरा आणि त्याच्या मित्रानं बलात्कार केला. सासरा आणि तिचा मित्र घरी झोपले असल्याची संधी साधत पीडित तरूणीनं घरातून पळ काढला. पळ काढल्यानंतर तरूणीनं थेट तिचे माहेर गाठले. तेव्हा सत्य समोर आलं.

त्यानंतर पीडित तरूणी आणि तिच्या आई वडिलांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, १२७(४), ३५१ (३), ७४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून, पोलीस पथक दोघांचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply