Bhiwandi corruption case : भिवंडीच्या सहायक पालिका आयुक्ताला अटक, ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Bhiwandi corruption case : भिवंडी महापालिकेचे सहायक आयुक्त सुनिल भास्कर भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाचेच्या रकमेतील ५०,००० रुपये स्वीकारताना दोघेही रंगेहाथ पकडले गेले. दोघांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या विभाग क्रमांक ४ मधील तांडेल मोहल्ला हमालवाडा येथील मुशीर अहमद मोमीन यांच्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, ही इमारत तोडू नये, यासाठी सहायक आयुक्त सुनिल भास्कर भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे यांनी दीड लाख रूपयांची लाच मागितली. ही मागणी त्यांनी इमारतीचे मालक मुशीर अहमद मोमीन यांच्याकडे केली.

Railway Block : पश्चिम रेल्वेवर शुक्रवार ते रविवार स्पेशल ब्लॉक; लोकलच्या ४२७ फेऱ्यांवर होणार परिणाम

रकमेबद्दल काही तडजोडी करण्यात आल्या. तडजोडी केल्यानंतर लाचेची रक्कम १ लाख ३० हजार रूपये निश्चित झाली. ही रक्कम सुनिल भोईर आणि अमोल वारघडे यांना देण्याचे ठरले. त्यातील ५० हजार रूपये पहिला हप्ता म्हणून देण्याचे ठरले. मात्र, लाच द्यायची नसल्यानं, मुशीर यांनी वरळीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत मुशीर अहमद मोमीन यांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानुसार, शनिवारी धामणगाव येथील सारिका हॉटेल येथे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला. तेथे मुशीर अहमद मोमीन यांच्याकडून सुनिल भोईर यांच्या उपस्थितित अमोल वारघडे याने ५० हजार रूपये स्वीकारले. पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आणि दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत भोईवाडा पोलीस ठाण्यात रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply