Crime News: गुन्हा केला एकाने मार खाल्ला दुसऱ्यांनी, बांगलादेशी समजून ४ मित्रांना भिवंडीत बेदम मारहाण

Bhiwandi : भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात चौघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा करणारा तरुण फरार झाला पण त्याच्यासोबत घरामध्ये राहणाऱ्या चौघांनाच नागरिकांनी चोप दिला. बांगलादेशी असल्याचे समजून या चौघांना मारहाण करण्यात आली. सध्या या चौघांना भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे भिवंडीमध्ये खळबळ उडाली आहे.

भिवंडी शहरातील हनुमाननगर परिसरात ही घटना घडली आहे. ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिचा विनयभंग करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या तरुणानेच हे कृत्य केले. यासीन शेख (२० वर्षे) असं विनयभंग करणाऱ्या तरुणाचे नाव असून सध्या तो फरार आहे. मात्र विनयभंगाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. यावेळी जमावाने विनयभंग करणारा तरुण ज्या घरामध्ये राहतो त्याच्यासोबत राहणाऱ्या तिघांना बांगलादेशी असल्याचे समजून घरात राहणाऱ्या तिघांना जबर मारहाण केली.

भिवंडी शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले असता ९ वर्षीय मुलगी आणि तिचा छोटा भाऊ घरामध्ये एकटे असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या तरुणांने फायदा घेतला. या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूश लावून स्वतःच्या घरी बोलावून नेले. त्यानंतर या तरुणाने या मुलीचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार मुलीच्या छोट्या भावाने पाहिला त्यानंतर त्याने आई-वडील घरी आल्यानंतर ही गोष्ट सांगितल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघड झाला.

Pune : MPSC पेपर विक्री प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन उघड, पोलिसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या

पीडित मुलीच्या आई- वडिलांसह स्थानिक त्या तरुणाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले पण हा तरुण फरार झाला होता. या तरुणाच्या घरामध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्रांनाच नागरिकांनी चोप दिला. बांगलादेशी असल्याचे समजून ३ ते ४ जणांना जमावाने मारहाण केली. या घटनेची माहिती तात्काळ भिवंडी शहर पोलिस ठाण्याला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतलं. या चौघांची पोलिसांनी चौकशी केली असता ते बांगलादेशी नसून झारखंडचे असल्याचे तपासातून उघड झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा विनयभंग करणाऱ्या यासीन सोभारुख शेख (२० वर्षे) विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply